Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!! जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैन

जाहिरात

 

कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कार

schedule16 Jun 25 person by visibility 406 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन :  कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍थेच्‍या राजारामपुरी येथील कार्यालयास गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले यांचा सत्कार पतसंस्थेच्या पदाधिकारीच्या हस्ते करण्यात आला.

          यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नसून, गोकुळच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा व विश्वासाचा आधार आहे. गेल्या अनेक वर्षांत या संस्थेने सभासद कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी अत्यल्प व्याजदराने कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. गोकुळच्या प्रगतीच्या वाटचालीत कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यातील कर्मचाऱ्यांची आर्थिक गरज ओळखून नव्या सुविधा सुरू करण्याची गरज असल्यास संघाचे व व्यवस्थापनाचे संस्थेस नेहमीच पाठबळ राहिल.

          पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांनी पतसंस्थेने वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार कर्ज मर्यादा वाढविणे, योग्य व्याजदर, ठेवी योजना आणि विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे कर्मचारी वर्गाचा संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. आभार संचालक राजेंद्र चौगले यांनी मानले. याप्रसंगी  पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग कापसे, संचालक राजेंद्र चौगले, जयदिप आमते, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंगटे, सुनिल वाडकर, संदेश भोपळे, दत्तात्रय डवरी, अशोक पुणेकर, गिता उत्तुरकर, पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes