+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Mar 23 person by visibility 280 categoryसामाजिक
अर्थ अवर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे  उपक्रम
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वीज बचतीचे महत्त्व नागरिकांना समजावे, कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, यासाठी 'अर्थ अवर' अंतर्गत कोल्हापूर शहरातील २२ हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली.
यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे बंद ठेवून आपला सहभाग नोंदवला. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, कोल्हापूर महानगरपालिका व महावितरणने हा उपक्रम आयोजित केला होता. बिंदू चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. यावेळी इंजिनिअरिंगच्या ३०० विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या.
साडेसात ते साठेआठ वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागाने २२ हजार पथदिवे बंद केल्याने महापालिकेची दीड लाख रुपयांची वीज बचत झाली. याबरोबर एका तासात १३२० किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला.
डॉ.डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे,अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले, डॉ.राहुल पाटील,तुषार आळवेकर, डॉ.प्रतीक गायकवाड, विशाल शिंदे तसेच एनएसएसचे विध्यार्थी अमृत नरके,प्रथमेश आरगे,सौरभ केसरकर,ओंकार कोतमीरे,रत्नदीप कांबळे,सुमित कांबळे,संकेत चौगुले,वैष्णवी पानवळ, प्रज्ञा महाडिक, मृदुला साळोखे, पूनम पाटील, दिव्या फगारे, स्वप्नील माने, वैभव पाटील, नचिकेत बेजगमवार, संकेत घाटगे आदी उपस्थित होते.   
    संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.