मुख्यमंत्र्यांच्यासोबत वीज कंत्राटी कामगार संघाची लवकरच बैठक-सुधीर मुनगंटीवार
schedule31 Jan 25 person by visibility 653 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुकीसंबंधी मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लवकरच बैठक लावणार असल्याचे आश्वासन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. पुणे येथे जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकर यांच्या घरी मुनगंटीवार आले होते. याप्रसंगी संघटनेच्यावतीने प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, रोहन पवार, विकास माने, पश्चिम महाराष्ट्र समरसता गतीविधीचे रवी ननावरे यांनी त्यांना वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यासंबंधी निवेदन दिले. ऊर्जामंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी वर्गाने केली पाहिजे. सरकार व प्रशासना सोबत संवाद हवा संर्घष नको अशी अपेक्षा अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केली.