टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्था
schedule19 Jun 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावर पेपर एकसाठी ९३७३ तर पेपर दोन साठी १४५०९ अशी परीक्षार्थी संख्या असून या परीक्षेसाठीचा हा आत्तापर्यंतचा उच्चांक संख्या आहे. कोल्हापूर शहरात पेपर एसाठी २८ केंद्र असून पेपर दोनसाठी ५४ केंद्रे आहेत. मोठया संख्येने परीक्षार्थी असल्याने समवेक्षकांची केंद्रसंचालक आणि परीक्षा यंत्रणेस शोधा शोध करावे लागणार आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षण कालावधीसाठी समवेक्षक कसे प्राप्त करावे असा प्रश्न केंद्र संचालकांसमोर आणि परीक्षा यंत्रणेसमोर उभा राहिल्याने यंत्रणेची मोठी धावपळ होणार आहे.२८ जून २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. एकूण सहा लाख एकशे पंचवीस परीक्षार्थी राज्यभरातून प्रविष्ट आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ .मीना शेंडकर जिल्हा नियंत्रक असून माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत सहनियंत्रक आहेत. या परीक्षेच्या नियोजनासंर्बधी कोल्हापुरात बैठक झाली. शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी दिली . विस्तासुतार पुढे म्हणाले की या परीक्षेसाठी दोन पेपर असून पेपर १ साठी दोन लाख अठ्ठावन्न हजार एकसष्ठ परीक्षार्थी प्रविष्ठ असून पेपर २ साठी तीन लाख बेचाळीस हजार चौसष्ठ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत . या परीक्षेसाठी सात हजार एकशे एकोणचाळीस दिव्यांग उमेदवार देखील प्रविष्ठ झाले असून मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी, सिंधी या माध्यम भाषांतून परीक्षार्थी प्रविष्ठ झाले आहेत. एका वर्गखोलीत २४ परीक्षार्थी असून त्यामागे एक समवेक्षक आहे. यासाठी नागमोडी बैठक व्यवस्था असून एका ओळीत सहा परीक्षार्थी अशी रचना आहे.
गैरमार्ग प्रतिबंधाचे अनेक उपाय असून फ्रिस्किंग, फेस रिक्गनेश न, नो मास्क, बुरखा, टोपी, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल प्रतिबंध, कडक पोलीस बंदोबस्त असून सकाळच्या सत्रात साडेनऊ वाजता आणि दुपारच्या सत्रात दीड वाजता परीक्षार्थींना सोडण्यात येईल अशी माहिती केंद्रसंचालक संजय सौंदलगे यांनी दिली.