शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटप
schedule19 Jun 26 person by visibility 50 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवसेनेचा साठावा वर्धापनदिन कोल्हापुरात जल्लोष साजरा करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे जिलेबी वाटप केले. ढोल-ताशांच्या गजरात तसेच घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करत आणि पक्षाच्या स्थापनेपासूनच्या ६० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आनंद व्यक्त करत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला असून ढोल-ताशांच्या तालावर शिवसैनिकांनी उत्स्फूर्त नृत्य करत वर्धापन दिनाचा उत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, विनायक साळोखे, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगिता सावंत, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, शहरप्रमुख रणजित जाधव, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, सुनील जाधव, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, राज जाधव, राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, अनिल पाटील, दुर्गेश लिंग्रस, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, गौरी माळदकर, पूजा कामते, सुनिता भोपळे, सना अत्तार उपस्थित होते.