+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Dec 22 person by visibility 383 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हाापुरस्कार देऊन सन्मानितत करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे शाहूंच्या विचारांचा सन्मान आहे, अशा शब्दात डॉ. पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली .
कोल्हापूरचा नवलौकिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या सुपुत्रांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार डॉ.पवार यांना जाहीर झाला होता.
प्रकृतीच्या कारणामुळे दिवाळी दरम्यान झालेल्या ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्रदान सोहळ्या वेळी त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे सोमवारी आमदार सतेज पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यासोबत घरी जाऊन डॉ पवार याना सन्मानित केले. 
डॉ पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना हा पुरस्कार हा शाहू विचारांचा सन्मान आहे.शाहू महाराजांच्यामुळे इथे पर्यंत आलो .शाहु महाराजांनी बोर्डिंग सुरू केली., त्यातील एका बोर्डिंग मध्ये राहून मी शिकलो . त्यानंतर नोकरी करत इतिहास संशोधन करत इथपर्यंत येऊ शकलो. त्याकाळात मुलांसाठी बोर्डिंग सुरू करणे हा क्रांतिकारी विचार होता. आपण कल्पना करू शकत नाही, असे शाहू महाराजांचे कार्य होते. ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.आमदार सतेज पाटील म्हणाले, डॉ.पवार यांनी केलेले कार्य हे भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथ संपदा ही वैचारिक समृद्धता देणारी आहे. 
यावेळी पवार यांनी आमदार पाटील यांना पुस्तके भेट दिली‌ त्यांच्यामध्ये इतिहासातील विविध विषयांवर सुमारे तीस मिनिटे चर्चा झाली.यावेळी वसुधा पवार , माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, ब्रँड कोल्हापूर समिती सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजय दळवी,चेतन चव्हाण, प्राचार्य महादेव नरके ,अनुराधा कदम , डॉ.मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.