तृप्ती करेकट्टी यांच्याकडून शरण साहित्य अध्यासनास देणगी
schedule23 Mar 24 person by visibility 411 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी शरण साहित्य अध्यासनासाठी २१ हजार रुपयांची देणगी प्रदान केली. शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनासाठी लोकवर्गणीतून निधी संकलन केले जात आहे. महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या सहकारी शरण-शरणींनी निर्माण केलेल्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन यासाठी सदरचा निधी वापरण्याचे नियोजन आहे. विविध समाज घटकांकडून शिवाजी विद्यापीठास या कार्यासाठी देणगी दिली जात आहे. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी आज शरण साहित्य अध्यासनासाठी २१ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी यश आंबोळे उपस्थित होते.