जिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला
schedule24 Jun 24 person by visibility 241 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी सहा जुलै 2024 रोजी सकाळी अकरा वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली आहे.
या बैठकीत आठ जानेवारी 2024 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत माहे मे 2024 अखेरील आढावा घेणे व आयत्यावेळचे विषय होणार आहेत.