Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमकउलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  - विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकरबोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाशिष्यवृत्ती परीक्षेचा जिल्हा परिषद शाळांचा झेंडा !  जरगनगर विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी राज्यात द्वितीयस्थानी ! !संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागर

जाहिरात

 

दूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

schedule11 Aug 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :   शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२६२७ साठीच्या विविध पदवी, पदव्युत्तर ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस  १० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.पी.एस.पाटणकर यांनी दिली.
    
दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्रा अंतर्गत बी.., बी.कॉम., एम.. (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इतिहास), एम.कॉम. आणि एम.एस्सी. (गणित) या दूरशिक्षण अभ्यासक्रमांसह एम.बी.., एम.कॉम. आणि एम.एस्सी. (गणित) या ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.   विविध कारणांमुळे नियमित शिक्षण घेता आलेले विद्यार्थी, शिक्षण अर्धवट राहिलेले विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी, गृहिणी, उद्योजक, शेतकरी, सैनिक, कामगार तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राचे अभ्यासक्रम एक उत्तम संधी उपलब्ध करून देतात. केंद्राच्या ८९ अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.
  
शिवाजी विद्यापीठाच्या https://www.unishivaji.ac.in  अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login   जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यालयाशी किंवा जवळच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा.   राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नियमित महाविद्यालय किंवा मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही नियमानुसार दुहेरी पदवी घेण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.पाटणकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes