पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियान
schedule11 Aug 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. २०२२ ते २०२७ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक शाळेत ‘असाक्षरमुक्त गाव’ करण्याची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय नियामक परिषद तथा जिल्हाधिकारी उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे अध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. गावातील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हा संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे. ‘असाक्षरमुक्त गाव’ अभियानाच्या माध्यमातून शंंभर टक्के साक्षर महाराष्ट्र घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे.
0000