Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाजज डडसंस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागरप्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरणगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नका कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसठठ डद

जाहिरात

 

संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागर

schedule10 Aug 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : नशामुक्त भारत अभियान, मिशन स्पंदन, भारत सरकार आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त व स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संस्कार विद्यालय, शिये येथे उत्साहात  झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर सिटीझन फोरमचे अध्यक्ष शिवाजी नरके होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.नरके यांनी नशेपासून दूर राहण्याचा संकल्प, व्यसनांचे दुष्परिणाम आणि निरोगी व आनंदी जीवनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. इयत्ता पहिली ते सातवीच्या सुमारे २९० विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा दिली. मुख्याध्यापक  मच्छिंद्र नाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक सुरेश पाटील, शिवाजी चौगले, राजेंद्र देशमुख, सायराबानू मोमीन, चैताली चौगले, संजीवनी भारती यांची उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes