उपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश
schedule11 Aug 26 person by visibility 19 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- कोल्हापूर महापालिकेचे उपमहापौर अक्षय जरग यांचा महापालिकेतील कार्यालयीन प्रवेश नुकताच झाला. जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते व महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून प्रवेश केला. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, माजी उपमहापौर विक्रम जरग, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेविका पल्लवी देसाई, मंगला साळुंखे, नेहा तेंडुलकर, माधुरी व्हटकर, यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. त्यांनी, उपमहापौर जरग यांना शुभेच्छा दिल्या.
0