Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमकउलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  - विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकरबोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाशिष्यवृत्ती परीक्षेचा जिल्हा परिषद शाळांचा झेंडा !  जरगनगर विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी राज्यात द्वितीयस्थानी ! !संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागरप्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरणगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नका कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !

जाहिरात

 

कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

schedule11 Aug 26 person by visibility 145 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकरच्या विरोधात कोल्हापुरात एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. एनएसयुआयचे  सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापुरात जोरदार आंदोलन झाले.  जिल्हाध्यक्ष चव्हाण व अन्य कार्यकर्ते, बसंत - बहार टॉकीज रोड परिसरातील मोटेगावकरच्या  आरसीसी  क्लासेसमध्ये पोहोचले. त्यांनी, मोटेगावकरच्या विरोधात जोरदार घोषणा देत आरसीसी क्लासेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन झाले.क्लासेसची तोडफोड करत आरोपीवर कठोर कारवाई करावी. क्लासेस बंद करून,मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे मागणी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. तसेच भ्रष्ट आरसीसी क्लासेस बंद करून विद्यार्थ्यांची फी परत करावी. शिवाय नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकरला कडक शिक्षा  देण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण व कार्यकर्त्यांनी केली. नीट पेपर फुटी प्रकरणाची सखट चौकशी करावी, दोषी व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, आरसीसी क्लासेस ची मान्यता रद्द करावी यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते. क्लासेसच्या समोर निदर्शनेही केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes