Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाजज डडसंस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागरप्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरणगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नका कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसठठ डद

जाहिरात

 

बोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपा

schedule10 Aug 26 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "जल, जंगल, जमीन आणि स्वाभिमान" या मंत्राने भारलेला जागतिक आदिवासी दिन रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ बोंद्रेनगर येथील जिल्हा परिषद सोसायटी हॉलमध्ये दिमाखात साजरा करण्यात आला. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या मातीत रुजलेले राज्यभरातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव  एकाच छताखाली एकवटले होते. त्यामुळे संपूर्ण हॉल "जय जोहार! जय बिरसा!" च्या घोषणांनी दणाणून गेला.

  आदिवासी क्रांतिकारकांना पुष्पहार अर्पण व मानाचा मुजरा करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याग आणि शौर्याच्या प्रतीकांना श्रद्धांजली वाहून नव्या पिढीला प्रेरणा देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दुर्गेश वळवी होते. त्यांनी, "आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या. शिक्षणाच्या जोरावरच आपण स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती करू शकतो. समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आपणही खांद्याला खांदा लावून काम करूया," असे आवाहन केले.

स्वागताध्यक्ष राष्ट्रपती शौर्य पदक विजेते  भगवंत शिंगाडे यांनीही आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत पाल्यांच्या शिक्षणावर भर दिला. ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या उपाध्यक्षा मंगल भिसे यांनी महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले. "समाजाच्या जडणघडणीत आणि प्रगतीत महिलांचा सहभाग मोलाचा आहे," असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला किरण ठोंगिरे, कृष्णा ठाकरे, सुभाष धादवड, संतोष आंबेकर, पोलिस अधिकारी समीर हिले, सुनील भाईक, डॉ. प्रकाश पावरा, दत्तात्रय पारधी, नितीन गभाले, संजय भोये उपस्थित होते. आदिवासी सेवक  खेवजी दाते यांचा "आदिवासी सेवक पुरस्कार" देऊन गौरव केला. शंकर पोटे, नारायण भोमाळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सुषमा तारडे यांना पदोन्नतीबद्दल सत्कार केला. शुभांगी रावते आणि अमित पोटकुले  यांनी समाजातील आपल्या भूमिकेबाबत  विचार मांडले. सुनील रावते आणि मच्छिंद्र बगाड  यांनी सूत्रसंचालन केले. नितीन गभाले यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes