डीवाय पाटील हॉस्पिटलच्या डॉ. वसुधा सावंत यांचे निधन
schedule02 Feb 24 person by visibility 483 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कदमवाडी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या स्त्री रोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ. वसुधा सावंत (वय ५७) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
डॉ. सावंत या गेल्या २० वर्षांपासून डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये कार्यरत होत्या. त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांच्या यशस्वी प्रसुती केल्या होत्या. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले व काही वेळातच हृदय हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले.
डॉ. सावंत यांचे पती सीपीआर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात आई, मुलगा डॉ. सिद्धार्थ, दोन बहिणी असा परिवार आहे
डॉ. सावंत यांच्या आकस्मित निधनाबद्दल डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अतिशय ख्यातनामस्त्री रोग व प्रसुती तज्ञ आपण गमावल्या आहेत. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील अशा शब्दात डॉ. पाटील यांनी आदरांजली व्यक्त केली.
संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुल सचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.