गव्याची कारला धडक, तिघे जखमी
schedule13 May 24 person by visibility 410 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी जवळ सोमवारी सकाळी गव्याने कारला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील तिघे जखमी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश अर्जुन मगजे आणि कोल्हापुरातील महेश श्रीकांत पाटील, आकाश महेश पाटील अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कारमधील तिघेही कारमधून कोकणला निघाले होते. राधानगरीच्या पुढे सांगावकर मळयासमोर गव्याने त्यांच्या कारला धडक दिली. कारमधील तिघेही जखमी झाले. कारचे नुकसान झाले. वनपाल सुर्यकांत गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.