पीआरएसआय कार्यकारी समितीवर विवेक सिद्ध यांची निवड
schedule27 Dec 25 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :'पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया' (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना व कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या कार्यकारणी समितीवर विवेक सिद्ध यांची निवड करण्यात आली आहे. सिद्ध हे कणेरी मठ येथे अनेक वर्षे सक्रिय आहेत. कणेरी मठ व हॉस्पिटलच्या विविध सेवा, योजनांचा लाभ लोकांना व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. कणेरीमठाचे काडसिद्धेश्वर महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. पीआरएसआय ही माध्यम क्षेत्राशी सबंधित ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी व्यावसाईक संघटना आहे. या संस्थेच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत व्यावसाईक, माध्यम क्षेत्रातील प्राध्यापक, पत्रकार व या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील तज्ञ मंडळींचे ज्ञान व अनुभव सर्वाना स्थानिक पातळीवर मिळणार आहे. या सर्वात जास्त फायदा पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील विद्यार्थांना होणार आहे. दरम्यान नवीन कार्यकारणीत शिवाजी विद्यापीठाच्या अध्यक्षपदी डॉ. निशा मुडे पवार, उपाध्यक्षपदी ‘नँक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील तर सचिव विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ.अंबादास भास्के यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.