Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी डॉ. अच्युत  गोडबोले  यांचे  व्याख्यान  प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठककोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

जाहिरात

 

खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी कॉंग्रेसचे ८१ प्रभागांमध्ये आंदोलन

schedule28 Aug 24 person by visibility 260 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी कोल्हापूर शहरात आंदोलन करण्यात आले आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी 81 प्रभागात हे आंदोलन झाले.
कोल्हापुरातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.मात्र हे खड्डे बुजविण्याची तसदी प्रशासन घेत नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय विरोधासाठी कोल्हापूरच्या जनतेला त्रास देऊ नका. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केली.  आपटेनगर चिवा बाजार चौक येथील आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील सहभागी झाले. ते म्हणाले, खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तसेच आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शहर प्रमुख सचिन चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ‘खड्डे मुक्त’ कोल्हापूरसाठी काँग्रेसच्यावतीने आम्ही आंदोलन करत आहोत.
 कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी २७८ कोटी रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती. त्यातील शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळाले असे म्हणतात. पण रस्ते कुठे आहेत? हाच प्रश्न आहे. रस्त्यांसाठी प्रशासकांसोबत आम्ही वारंवार बैठका घेतल्या. 
 नगरोत्थान तसेच अन्य योजनांतून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी महापालिका प्रशासक यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र राजकीय विरोधामुळे हा निधी मिळू शकलेला नाही. पण या राजकीय विरोधामुळे कोल्हापुरकरांची गैरसोय होत आहे. शासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा .
कोल्हापूर महापालिकेत प्रशासक आहेत. त्यांच्या आडून आपल्याला हव्या त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचे काम महायुती सरकार करताना दिसत आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी, जनतेच्या सोयीसाठी लवकरात लवकर खड्डे मुजवावेत हीच आमची मागणी आहे.
 आंदोलनावेळी ‘कोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, महागळती सरकारचा धिक्कार असो, रस्ते द्या रस्ते द्या,आम्हाला चांगले रस्ते द्या, रकोल्हापूरवर प्रशासकराज लादणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, अरे टॅक्स भरतोय, रस्ते द्या, अरे फाळा भरतोय,रस्ते द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी महिलांनी खड्डयाभोवती रांगोळी काढल्या
 आमच्या मरणाची वाट बघता का? -वयोवृद्ध महिलेचा संतप्त संवाल
महापालिकेला कोल्हापुरातील जनतेकडून घरफाळा पाहिजे, पाणीपट्टी पाहिजे, अन्य सर्व कर पाहिजेत मग चांगले रस्ते का दिले जात नाहीत ?आम्ही या खड्ड्यातच मरायचे का? असा उद्विग्न सवाल वयोवृद्ध अनुराधा कुसाळे यांनी केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes