संपाबाबत संभ्रमावस्था ! जिल्हा परिषदेत संघटना प्रतिनिधींची बैठक
schedule21 Mar 23 person by visibility 951 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेऊ" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप माघारीचे घोषणा केली. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांच्यात संपाबाबत संभ्रमावस्था आहे. संप पुढे कायम चालू ठेवायचा की आहे तो प्रस्ताव मान्य करायचा अशा मनस्थितीत कर्मचारी असल्याचे चित्र आहे. त्या साऱ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे सर्व केडर मधील संघटना प्रतिनिधींची मंगळवारी (२१ मार्च)सकाळी नऊ नंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात चर्चा होणार आहे. या चर्चेत संपातील सहभाग कायम ठेवायचा की संपातून माघार घ्यायची याचा निर्णय होणार आहे. संघटना प्रतिनिधी यांच्यामध्ये जी चर्चा होईल ते जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. आता सकाळी होणाऱ्या चर्चेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.अनेक कर्मचाऱ्यांना नवीन प्रस्ताव मान्य नसून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मताचे ते आहेत