Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी डॉ. अच्युत  गोडबोले  यांचे  व्याख्यान  प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठककोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

जाहिरात

 

बोंद्रेनगरमधील घरकुलांची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा-आमदार सतेज पाटील

schedule22 Aug 24 person by visibility 259 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर मातंग वसाहतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या. या परिसरात वीज, पाणी कनेक्शन व चांगले रस्ते करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 आमदार  पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रे नगर मातंग वसाहतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७७ कुटुंबियांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची सबसिडी, सीएसआर फंडातून ५० हजार तर शेल्टर असोसिएट्सद्वारे ३० हजार असे एकूण ३ लाख ३० हजार रुपये मिळणार असून लाभार्थ्याला २ लाख ७० हजार भरावे लागणार आहेत. या योजनेतील ७७ पैकी २७ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ५० घरकुलांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 
गुरुवारी, आमदार  पाटील यांनी या घरकुलांच्या कामाची पाहणी केली. घरकुलांची कामे दर्जेदार करून सप्टेंबरच्या आत काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यानी कंत्राटदार राजेंद्र दिवसे आणि अभियंता अविनाश पोखर्णीकर यांना दिल्या. या परिसरात पाण्याची कनेक्शन, चांगले रस्ते, विजा जोडणी आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे आणि उपशहर अभियंता महादेव फुलारी, महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोहर पवार यांना दिल्या.
  स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, अभिजीत चव्हाण, महिपतराव बोंद्रे गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन अशोक देगावे, व्हाईस चेअरमन भिकाजी वायदंडे, शेल्टर असोसिएशनच्या संचालिका प्रतिमा जोशी, आर्किटेक्ट ऋतुजा भराटे, मनोज्ञा कुलकर्णी, मेघा लोंढे, महादेव कांबळे,बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मयूर गाढवे, व्यवस्थापक क्षुब्धा कुरकुटे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes