+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule07 Sep 22 person by visibility 309 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘चरित्र चित्रमय चित्ररथ’ हे लेटेस्ट तरुण मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष गजानन यादव यांनी दिली.
शुक्रवारी (ता.९ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात होईल. बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राजर्षी शाहू महाराज कृतज्ञतापर्वाच्या निमित्ताने चरित्र चित्रमय चित्ररथ यंदाच्या मिरवणुकीत असणार आहे. राधानगरी धरण, कोल्हापूर-मिरज रेल्वे, अस्वल व वाघाशी झुंज, साठमारी, हत्तीचा खेळ असे विविध प्रसंग व घटना चित्रमय स्वरुपात दाखविण्यात येणार आहेत.
याशिवाय धनगरी ढोलपथक, संस्थानकालीन झेंडा, मंडळाचे २५० कार्यकर्ते पारंपरिक वेशात मिरवणुकीत सहभागी होतील. पत्रकार परिषेदला मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण फडतरे, कार्याध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र दळवी, जीवन चोडणकर, अजित पोवार उपस्थित होते.
दरम्यान मिरवणुकीच्या नियोजनात अविनाश शिंदे, मंदार पोवार, आदित्य पोवार, संभाजी जाधव, शिवाजी दळवी, अजिंक्य पाटील, व्यंकटेश जाधव, सिद्धार्थ बेरळेकर, केदार सुर्यवंशी, दत्तात्रय हुजरे, हेमंत पाटील, मिलिंद हिर्लोस्कर इंद्रजित पोवार, पंडित पाटील, सुनील समडोळीकर, ऋतुराज म्हामुलकर, सुनील पाटील, संदीप शेलार, जितेंद्र कदम, सोहम गायकवाड, संतोष यादव, बबलू सावंत आदी मिरवणुकीच्या नियोजनात सक्रिय आहेत.