कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर
schedule24 Apr 26 person by visibility 6 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर होण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आश्वस्त केले.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ ते कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नूतन कोर्टरुमच्या कोनशिलेचे अनावरण श्री चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. श्री चंद्रशेखर यांनी, सायंकाळी सर्किट बेंचसाठीच्या शेंडापार्क येथील नियोजित जागेची पाहणी केली. विशेष म्हणजे, मुख्य न्यायमूर्तींनी डिव्हिजन बेंचमध्ये प्रत्यक्ष कामकाजात सहभाग घेतला. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासोबत त्यांनी दिवसभरात सहा जनहित याचिका व अन्य खटल्यांचे कामकाज पाहिले.
सायंकाळी त्यांचा, सर्किट बेंच बार असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त् विद्यमाने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी, ‘कोल्हापूर सर्किट बेंचचे काम चांगले सुरू आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमुळे तरुण वकिलांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.’असे नमूद केले. याप्रसंगी डिव्हिजन बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती ए एल पानसरे, न्यायमूर्ती एम. डब्ल्यू चंदवाणी, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती सचिन देशमुख, रणजीत भोसले, मुंबई उच्च न्यायालयाचे महाधिवक्ता अनिल सिंग, मुख् सरकारी वकील शिशिर हिरे, नेहा भिडे, सरकारी वकील पंकज देवकर, श्रीराम चौधरी, नितीन पाटील, विकास माळी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला बार असोसिएशनचे तेजपाल इंगळे, श्रीकृष्ण गणबावले, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, अीड. संतोष शहा, अजित मोहिते, शिवाजीराव राणे, राजेंद्र मंडलिक, मुकुंद मोरे आदी उपस्थित होते. अॅड. प्रियांका राणे यांनी सूत्रसंचालन केले.