Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज ददशिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हललाप्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडीनऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हलला

schedule04 Jul 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उपकुलसचिव स्तरावरील या बदल्या आहेत. विद्यापीठात जवळपास नऊ वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करत होते. बदल्यांच्या आदेशाने त्यांच्या कामाचे ठिकाण बदलले.दरम्यान कामकाजावरुन काही विभागाकडून तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्य होत्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासकीय पातळीवर कामकाजाच्या अनुषंगाने बदल करण्यात येत आहेत. कुलसचिव व्ही. एन शिंदे यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या होत असल्याचे म्हटले आहे. या बदल्यासाठी विद्यापीठातील काही संघटनांनी प्रशासनाकडे आग्रह धरला होता.

विद्यापीठातील आस्थापना विभागातील उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे आणि पीजीबीयूटीआरमधील डॉ. विलास सोयम यांची परीक्षा विभागात बदली झाली. तर परीक्षा विभागातील दीपक अडगळे यांची संलग्ना टी टू तर डॉ. निवास माने यांची संलग्नता टी वनमध्ये बदली करण्यात आली. महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळातील संध्या अडसुळे यांची विशेष कक्ष व अभ्यास मंडळ येथे बदली झाली. विशेष कक्षातील उपकुलसचिव विभा अंत्रेडी यांची बदली पीजीबीयूटीआरमध्ये झाली. नॅक व आवक - जावकमधील डॉ. उत्तम सकट यांच्याकडे आस्थापनाचा तर संलग्नता टी वनमधील डॉ. गजानन पळसे यांची महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ येथे झाली. संलग्नता टी टूमधील डॉ. प्रमोद पांडव यांची बदली नॅक व आवक- जावक विभागात झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes