समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यश
schedule03 Jul 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळाले. संपून समग्र शिक्षा मधील उर्वरित करार कर्मचाऱ्यांना आधिसंख्य हे पद निर्माण करून सरकारी सेवेत कायम करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला. दोन जुलै रोजी हा निर्णय झाला. दरम्यान आझाद मैदान येथे ९ मार्च ते दोन जुलै २०२६ या कालावधीत आंदोलन झाले.समग्र शिक्षा संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री भरत गोगावले, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आभार मानले. शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे, समग्र शिक्षा अभ्यास समिती सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे ,आमदार मनिषा कायंदे ,आमदार मा. ज. मो. अभ्यंकर, आमदार किशोर जी दराडे, निरंजनजी डावखरे यांच्यासह विविध शिक्षक संघटना, प्रशासन यांचे आभार मानत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.