Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑल

schedule03 Jul 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर :  इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी शुक्रवारी, तीन जुलै रोजी दुपारी जाहीर करण्यात आली. वि‌द्यार्थ्यांनी एसएमएसवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आपल्या लॉगीनमध्ये आपल्याला केंद्रीय कोटयांतर्गत कोणते कनिष्ठ महाविद्यालय आहे हे तपासावे व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे.   ज्या विद्यार्थ्यांस विशेष फेरी  अंतर्गत गुणवत्ता यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय निश्चित झाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला इयत्ता १० मध्ये मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कट-ऑफ याचा विचार करून विशेष फेरी  ऑपन टू ऑल 02  फेरीमध्ये आपल्या प्रवेश अर्जाच्या भाग २ मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महावि‌द्यालयाचे पसंतीक्रम भरून आपला प्रवेश अर्ज भाग २ लॉक करून प्रिंट काढणे आवश्यक आहे. वि‌द्यार्थ्याने कोणत्याही कोटयातून (केंद्रीय ऑनलाईन / अल्पसंख्याक / इन-हाऊस / व्यवस्थापन कोटा) एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. अशी माहिती प्रसिद्धीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes