नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
schedule03 Jul 26 person by visibility 98 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : टीईटी कायमची रद्द करावी, पदोन्नतीसाठी टीईटी सक्ती रद्द करावी, शाळा संच मान्यतेच्या जाचक अटी रद्द कराव्यात तसेच बीएलओ व एसआयआर कामांसाठी शिक्षकांना दिलेले आदेश त्वरित रद्द करावेत या मागण्यासाठी ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने सामुदायिक रजा घेवून शाळा बंद आंदोलनात सहभागाचा निर्णय झाला. आंदोलनात संस्था चालक संघ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना शाळा बंद ठेवून सहभागी होणार असल्याचे जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी दिली.
मुख्याध्यापक संघामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ तसेच सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये सर्वांनुमते शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला. शाळा बंद आंदोलनामध्ये सर्व शिक्षक कर्मचारी सहभागी होणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चासाठी सर्वांनी दसरा चौक येथे सकाळी ठीक दहा वाजता जमावे असे आवाहन लाड यांनी केले.
तसेच टप्पा वाढ अनुदानासाठी ७ व ८ जुलै रोजी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या दिवशी सर्वांनी काळ्या किती लावून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेचेही त्यांनी जाहीर केले. या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, शिक्षक नेते दादा लाड, भरत रसाळे, राजाराम वरुटे, आर वाय पाटील, सी. एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, संतोष आयरे, विलास पिंगळे, सुनील पवार, यशराज गाडे, सचिन कोंढरे, सावंता माळी, बालाजी पांढरे, संतोष गायकवाड, दिलीप माने उपस्थित होते.