महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील गोकुळशी संलग्नित प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चासाठी दहा पैसे वाढ करण्याची घोषणा चेअरमन अरुण डोंगळे यांनी केल्यानंतर त्यांचा प्राथमिक दूध् संस्था कर्मचारी संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच दूध संस्था कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रतिलिटर पाच पैसे वाढीचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त या सत्काराचे आयोजन केले होते.
याबद्दल गोकुळचे चेअरमन डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था व दूध संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग यांचा गोकुळच्या प्रगती मध्ये मोलाचे योगदान आहे. हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ संबंधित सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात संघाच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकापर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.”
गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ,रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सूनिल विभूते,रमेश पाटील, संजय हाळदकर,आबासो पाटील, दिनकर कोतेकर, मोहन धुंदरे, शिवाजी गायकवाड उपस्थित होते.