क्रिडाई कोल्हापूरतर्फे योगा डे साजरा, पुण्य प्रवाह गृहप्रकल्पात कार्यक्रम
schedule22 Jun 24 person by visibility 303 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांची प्रमुख संस्था समजल्या जाणाऱ्या क्रिडाई कोल्हापूरतर्फे 21 जून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. रामसिन्हा ग्रुपच्या नागाळा पार्क येथील पुण्य प्रवाह प्रकल्प येथे योगदिनाचे आयोजन केले होते वरती आयोजन केले होते. क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदीप मिरजकर, सहसचिव गणेश सावंत, संचालक विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले, संदीप पोवार व योगागुरु प्राजक्ता कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी योगागुरु प्राजक्ता कुलकर्णी यांनी आजच्या धावपळीच्या जगात योगाचे महत्व पटवून दिले.आनंदी व समाधानी होण्यात विकारांचा अडथळा असतो हे अडथळे दूर केल्यास निश्चितच समाधान, आनंद आपल्या पासून दूर नाही. असे सांगितले.
या कार्यक्रमास क्रिडाईचे माजी उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, रामसिन्हा ग्रुपच्या चेअरमन संजीवनी ओसवाल, क्रिडाई कोल्हापूरचे सभासद श्रीधर कुलकर्णी, महेश पोवार, नारायण पोतदार, सुधाकर सुरवसे, योगेश आठले, पुण्यप्रवाह सोसायटीचे अध्यक्ष संजय कदम व उपाध्यक्ष रितेश जोशी व सोसायटी मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.