२९ जूनचे पदोन्नती समुपदेशन रद्द करावे, सेवाज्येष्ठ शिक्षकांचे प्रशासनाला निवेदन
schedule31 Oct 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने २९ ० ३० जून २०२६ जून रोजी झालेले पदोन्नती समुपदेशन रद्द करावे अशी मागणी जिल्ह्यातील सेवाजेष्ठ शिक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनद्वारे केली आहे. निवेदनावर प्रसाद पाटील, सखाराम राजुगडे, नवनाथ व्हरकट, सुरेखा पाटील, अरुण पाटील, संजीवकुमार सुतार, राजेंद्र जाधव, जयेंद्र लाटणे, सर्जेराव पाटील, बाळासाहेब कांबळे, संजीवकुमार सुतार, रमेश अमनगी, नंदकुमार पाटील, रावसाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी म्हटले आहे, ’१४ मे २०२६ च्या शासन पत्रान्वये सहावर्षे सेवा झालेले मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी होत होते. हा ३३-३४ वर्षे सेवा झालेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय होता. त्यामुळे सेवाजेष्ठ शिक्षकांचा हायकोर्टात पाठपुरावा सुरू आहे.’