देवस्थान समितीतर्फे अंबाबाई देवीचे कॅलेंडर प्रकाशित
schedule22 Oct 24 person by visibility 115 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. देवस्थान समितीने २०२५ या वर्षासाठी तयार केलेल्या कॅलेडरमध्ये श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे तसेच इतर स्थानिक देवस्थान कडील फोटो व इतर सण उत्सवची माहिती आहे.
या कॅलेंडरचे प्रकाशन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिडे, लेखाधिकारी अस्मिता मोठे, शितल इंगवले आदी उपस्थित होते. या कॅलेंडरचे देणगीमूल्य साठ रुपये आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.