पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
schedule09 Oct 26 person by visibility 72 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे आता ४७ आणि तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूरअसे पाच जिल्हयांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, ९ ऑक्टोबरपर्यंत होती. पदवीधर मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६९ उमेदवारांचे ८१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २२ उमेदवारांनी माघार घेतली. आता पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण मतदान तीन लाख ८८ हजार ०१९ इतेक आहे. एकूण ७४१ मतदान केंद्रावर मतदानाची सोय आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात४९ उमेदवारांनी ६७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४८ उमेदवारांचे ६५ अर्ज वैध ठरले. १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिक्षक मतदारसंघात एकूण तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदार ६२ हजार आहेत. ३१० मतदान केंद्रे आहेत. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या एक लाख १४ हजार ५६२ इतकी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८८,२०२ इतकी आहे. सांगली जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंख्या ८८,०७० आहे. सोलापूर जिल्ह्यात ४९,७२२ तर सातारा जिल्ह्यात ४७४६३ मतदार आहेत. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण शिक्षक मतदारांची संख्या ६२ हजार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६,८८२ इतके सर्वाधिक मतदार आहेत. सोलापूर जिल्ह्यात १५,३०३ मतदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १२,२९९ मतदार आहेत. सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या ९४५४ इतकी आहे.तर सातारा जिल्ह्यातील शिक्षक मतदार संख्या ८०६२ आहे.