Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय एक राखी सीमेवरील जवानांसाठी,  स्वामी विवेकानंद ट्रस्टचा उपक्रमआर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यशजिल्हा परिषदेत सदभावना दिनानिमित्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ  उद्योगरत्न पुरस्कार सोहळयात सचिन शिरगावकरांनी सांगितली यशाची चतु:सूत्री टीडीएफची रविवारी पुण्यात बैठक, शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीप्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावाअधिकारी कंत्राटदारांची मिलीभगत, रस्ते कामात ढपला - डिझेल विक्रीत डल्ला ! महापालिका सभेत नगरसेवकांकडून पोलखोल ! !भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रमतेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!

जाहिरात

 

न्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय

schedule21 Aug 26 person by visibility 58 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन :  न्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय दिले जात असल्याचा आरोप कावणे येथील हर हर महादेव दूध संस्थेचे प्रवीणसिंह पाटील यांनी केला. शुक्रवारी, सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. गेल्या पाच वर्षांमध्ये नियमांना फाटा देऊन 800 प्राथमिक संस्था वाढल्या आहेत. ज्या दूध संस्था नियमात बसतात त्यांना न्याय द्यावा . जे नेमांची पूर्तता करत नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही शिस्त मंडळांनी केली अनेक दूध संस्था या केवळ कागदोपत्री आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

   '४ जानेवारी २००० रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध संस्थेने सरासरी किमान 50 लिटर दूध प्रति दिन संकलित करणे आवश्यक आहे. तरच ती संस्था नोंदणीकृत होऊ शकते. गोकुळच्या उपविधीनुसार अशा नोंदणीकृत संस्थेने सलग ९० दिवस गोकुळला दूध पुरवठा केल्यानंतरच गोकुळचे सभासदत्व प्राप्त होते. पण माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार गोकुळला शून्य लिटर दूध पुरवठा करणाऱ्या तब्बल २०० हून अधिक संस्थांना सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. प्रतिदिन दहा लिटर दूध संकलन असणाऱ्या १५० संस्था, 30 लिटरच्या आत दूध संकलन करणाऱ्या २८१ संस्था तसेच 30 ते 50 लिटरच्या दरम्यान दूध संकलन करणाऱ्या ३२८ संस्थांना नियमबाह्यरित्या सभासदत्व देण्यात आले.  त्याचबरोबर अनेक संस्थांची नोंदणी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी त्यांना गोकुळचे सभासद करण्यात आले तर काही संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच गोकुळचे सभासद होण्याची लॉटरी लागली. 
हा प्रकार म्हणजे मूल जन्माला येण्याआधीच त्याचा दहावीचा निकाल लागण्यासारखा आहे' असा टोलाही पाटील यांनी लगावला. 
 याप्रसंगी कृष्णा यशवंत चौगुले ,एस बी भंडारी, विजय भोसले, राजेश नाईक,  विजय बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते
.....
स्वतःच्या स्वार्थासाठी गोकुळसारखी चांगली चाललेली संस्था बंद पाडण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. सहकार मोडीत काढून ज्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर संस्था बळकावल्या त्याचप्रमाणे गोकुळही ताब्यात घेण्याचा हा डाव प्रामाणिक दूध संस्था प्रतिनिधी येणाऱ्या निवडणुकीत उधळून लावतील.' असे प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes