
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझनचे मार्गदर्शक उद्योजक नरेंद्र झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले.
श्रीराम फौंड्री युनिट नंबर १, एम.आय.डी.सी.शिरोली येथे गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर झाले. शिबिरासाठी राजर्षी शाहू ब्लड बँक, कोल्हापूर या ब्लड बँकेला निमंत्रित केले होते.
प्रतिवर्षी १ सप्टेंबर रोजी अखंडित रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या सदस्यांच्या सोबतच झंवर इंडस्ट्रीच्या युनिट मधील व्यवस्थापक, कर्मचारी व परिसरातील उद्योजक- व्यावसायिक यांनी रक्तदान केले. होरायझनचे सचिव सागर बकरे यांनी आभार मानले.
वर्षातून किमान दोन वेळातरी प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ होरायझनचे आणि रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे ट्रेझरर अवधूत चिकोडी, अभय बीचकर, समीर पाटील, दीपक करगुप्पीकर, राजू पाटील, प्रमोद सूर्यवंशी, पवन रोचलानी, सतीश कुलकर्णी, विशाल माने उपस्थित होते.