पोलिसांची जुगार अड्डयावर मोठी कारवाई, २२ जण अटकेत
schedule04 Sep 22 person by visibility 895 categoryगुन्हे

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन ठिकाणी कारवाई
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
स्थानिक अन्वेषण शाखेने जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून २२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून अंदाजे रोख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वारणा नदी पूल ते निववाडे मार्गावरील शिवशंभो कला क्रीडा सांस्कृतिक क्लबवर छापा टाकला. पोलिसांनी रोख रकमेसह दोन लाख ९४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रय सुभाष सपाटे (वय 40 रा. चिकुर्डे ता.वाळवा), मेहबूब शिकावे (नवे पारगाव) , भीमराव बाळू दुर्गाडे (गंगा तारा कॉलनी, कोडोली) दादासो महादेव तोडकर (माळवाडी चिकुर्डे, वाळवा), पवन बापू माने (गोसावी गल्ली, कोडोली) विशाल विलास पाटील (कोडोली), सतीश शामराव माळी, शौकत उस्मान मुल्ला (दोघे ऐतवडे खुर्द, वाळवा), आमित भीमराव डिंगणे (मोहरे ,ता. पन्हाळा), संतोष आनंदा पवार (कोडोली), राजाराम गणपती थोरात (ऐतवडे बुद्रुक), प्रकाश हिंदुराव पाटील (ठाणापुडे, वाळवा), जहांगीर अब्बास मुल्ला (ऐतवडे खुर्द) यांना अटक केली.
पोलिसांनी कसबा तारळे येथील युवराज पांडुरंग खामकर यांच्या घरी असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख एक लाख 36 हजार ४४० रुपये जप्त केले. गुरुनाथ महादेव पाटील (कसबा तारळे), शहाजी भिकाजी जाधव, अमीर मिरासो नाईकवडी (कसबा तारळे) रवींद्र नामदेव कांबळे, रमेश अरविंद पवार (दोघे राधानगरी), संतोष मधुकर पाटील, सर्जेराव मधुकर खामकर, दिलीप सखाराम पाटील, युवराज पांडुरंग खामकर (सर्व रा. कसबा तारळे) यांना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, नेताजी डोंगरे यांच्या सह पोलीस कॉन्स्टेबल अनिल पास्ते, संजय पडवळ, हिंदूराव केकरे, संतोष पाटील, रणजीत कांबळे, रणजीत पाटील, सोमराज पाटील रफिक आवळकर, राजेंद्र वाडकर यांनी कारवाईत भाग घेतला.