रोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम
schedule11 Apr 24 person by visibility 512 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सोळा एप्रिलला "मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह" अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत "संजीवनी" हा ९० मिनिटाचा भरतनाट्यम कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे अशी माहिती प्रेसिडेंट कल्पना घाटगे, सचिव शोभा तावडे, खजानिस ममता झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भरतनाट्यमचे आदित्य पी.व्ही आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या ग्रुपचे सादरीकरण कार्यक्रम होणार आहे. मेनन ड्रीवेन बाय टेक्नॉलॉजीचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे.या कार्यक्रमाचे पासेस चार दिवस आधीपासून नाट्यगृह येथे उपलब्ध असणार आहेत. महाजन पब्लिसिटी ९५६१६२६६६३ यांच्याकडेही पासेस मिळतील. कार्यक्रमात एकूण ७ जण नृत्याविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. ज्यात राम आणि सीता, दीपावली, नृत्य संजीवनी, पुण्य कृष्ण,आदी शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी,भजन आणि श्रीराम यांच्यावर आधारित नृत्यांचा समावेश असणार आहे.असे कविता नायर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सचिन मेनन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.