+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Mar 24 person by visibility 356 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रताप उर्फ बाळसाहेब शंकरराव घाटगे (वय ७३) यांचे निधन झाले.बाळ घाटगे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कारकीर्दीत गांधी मैदानात एक लाख मराठा मेळावा ८० च्या दशकामध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यातच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सर्वप्रथम मागणी झाली होती .
भगतसिंग तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून घाटगे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. १९७५ ते १९८५ या कालावधीत भगतसिंग तरुण मंडळाने घाटगे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर ते सातारा मोटरसायकल स्पर्धा, कोल्हापूर ते कराड सायकल स्पर्धा, कोल्हापूर ते अंबा सायकल शर्यत आयोजित करून घाटांचा राजा हा किताब दिला जात असे.
 खासबाग मैदानात त्यांनी पहिली बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केली होती .१९९० मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ते शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष होते. त्यांनी महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी असा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवारी ( ता.२७) सकाळी नऊ वाजता होणार आहे.