
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
राज्यातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी दिले. आ.आसगावकर यांच्या निधीतून जिल्ह्यातील ६८ अनुदानित, शासकीय वसतीगृह व निवासी शाळांना थ्री-इन-प्रिंटर वाटप समारंभात बोलत होते. वसतिगृह संस्थाचालक, कर्मचारी संघटनेच्या वतीने आम.आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
आसगावकर म्हणाले, पुणे विभागातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. शाळांशी संबंधित असलेल्या वसतीगृह व निवासी शाळा व विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
यावेळी बोलताना अनुदानित वसतिगृह संस्थाचालक संघाचे सचिव प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी पुणे विभागातील सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. त्याप्रमाणे अनुदानित वसतिगृहांना शैक्षणिक साहित्य देण्याची भूमिका आ.आसगावकर यांनी घेऊन मदतीचा हात दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
समाज कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी माचरे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संस्थाचालक संघाचे संचालक के. ए. देसाई, के.के.पाटील, श्रीकांत पाटील, अमर देसाई, साताप्पा कांबळे, नवनीत पाटील, जयसिंग देसाई, सुभाष कलागते, संजय पाटील, पी.डी.खाडे आदी उपस्थित होते.
कोजिमाशीचे माजी चेअरमन संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.वसतिगृह कर्मचारी संघटनेचे साताप्पा कांबळे यांनी आभार मानले.