+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Aug 22 person by visibility 250 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर येथील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अॅड प्रशांत चिटणीस यांना "नीतीप्रज्ञ न्यायरक्षक" पुरस्कार - 2022 प्रदान करण्यात आला‌. सन्मानचिन्ह, रोख पाच हजार रुपये व दहा हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन ॲड. महादेवराव आडगुळे आणि लातूरचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. मंचकराव डोणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे उपाध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष अनिल म्हमाने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.मुख्य निमंत्रक व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी प्रास्ताविक केले. सनी गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, अरहंत मिणचेकर, ॲड. अकबर मकानदार,ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. शैलजा चव्हाण, सुरेश केसरकर, नंदकुमार गोंधळी, सोमनाथ घोडेराव, प्रशांत आवळे, विठ्ठल शालबीद्रे  उपस्थित होते.