महापालिकेतर्फे नऊ शिक्षक, तीन कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार जाहीर
schedule04 Sep 24 person by visibility 1100 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्याने महानगरपालिका व खाजगी अनुदानित शाळातील गुणी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करुन त्यांचा यथोचित सत्कार केला जातो. यंदाच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका शाळेतील पाच सहायक शिक्षकांना आदर्श शिक्षक तर खासगी शाळेतील तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महापालिकेच्या छत्रपती संभाजी विद्यामंदिर देवकर पाणंद येथील जितेंद्र दिनकर मोरे यांना कलाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. महापालिकेच्या शाळेतील तीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
महापालिका शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त यादीमध्ये मनिषा ऋषिकेश पांचाळ (
मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर ), सहायक शिक्षक निता प्रशांत खाडे ( मनपा डॉ. सर्वपलली राधाकृष्णन विद्यामंदिर ), सहायक शिक्षक संभाजी मारुती चौगले ( मनपा रा.छ.संभाजी विद्यामंदिर देवकर पाणंद ), सहायक शिक्षक वैशाली विजय कोळी (यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर ), सहायक शिक्षक श्रीमती वंदना संजय कमले (मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिर ) यांचा समावेश आहे.
खासगी शाळेतील आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकामध्ये सहायक शिक्षक कैलास कुंडलिक भोईटे ( न्यू हायस्कूल मराठी शाखा ), सहायक शिक्षक शोभा प्रकाश शित्रे ( नेहरु विद्यालय राजारामपुरी), सायली सतीश शेडगे (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
महापालिका शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी शिवाजी गणपती पाटील ( मनपा द्वारकानाथ कपूर गंजीमाळ भाग शाळा ), शब्बीर हुसेन नदाफ (राजाराम महाराज ऊर्दू मराठी स्कूल), प्रविण गणपत पिसाळ (मनपा एस्तेर पॅटर्न स्कूल कनाननगर ) यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता महानगरपालिका ५ शाळा व खाजगी अनुदानित ३ शाळा असे एकूण ८ सहायक शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते. पुरस्कार निवड समितीमध्ये उपायुक्त साधना पाटील, डाएटच्या अधिव्याख्यात्या डॉ. अंजली सतिश रसाळ अधिव्याख्याता, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, प्राचार्य प्रभाकर शाहू हेरवाडे, शिक्षण समिती शैक्षणिक पर्यचक्षक विजय सिद्राम माळी यांचा समावेश आहे. या समितीतर्फे २७ ऑगस्ट रोजी प्रस्ताव प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. प्रस्ताव प्राप्त शिक्षकांच्या मौखिक मुलाखती घेवून गुणदान केले होते.