Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
५० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या काँग्रेसकडे मुलाखती ! इच्छुकांची संख्या ३२९ ! !पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रा. निशा मुडे, उपाध्यक्षपदी डॉ. जगन्नाथ पाटील, सचिवपदी विश्वजीत भोसलेहौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून वसुभूमी प्रथम आजीबाईंची शाळा…!सत्वशिला साळुंखे यांचे निधन काँग्रेसकडून मुलाखती ! माजी महापौर-नगरसेवकासह पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक ! !हसन मुश्रीफांकडून आदिल फरासांची उमेदवारी घोषितनूतन मराठी विद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभसरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार त्यांना पद दिलं, महापौर केलं ! माझं काय चुकले ? सतेज पाटलांच्या निशाण्यावर आजरेकर

जाहिरात

 

सांगोलानजीक अपघात, नांदणीचे दोघे ठार

schedule07 Oct 24 person by visibility 724 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवदर्शन करुन परत येत असताना झालेल्या अपघातामध्ये नांदणी येथील दोघे ठार झाले. सोमवारी, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपासजवळ कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी आहेत.
 कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव आणि नांदणी येथील पाच मित्र कारने देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते सोमवारी पहाटे गावाकडे परत येत होते. सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपास जवळ कारने, सोळा चाकी मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमधील नांदणीचे नैनेश कोरे व सुखदेव बामणे हे दोघेही ठार झाले. तर वडगाव येथील सुधीर चौगुले, अनिल शिवानंद कोरे (नांदणी) व सुरज विभुते (कोठली) हे तिघे जखमी आहेत. जखमीवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes