Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडेपुणे पदवीधरमध्ये  उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष !  महायुतीकडून स्मिता जाधव,  महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

जाहिरात

 

गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !

schedule12 Oct 26 person by visibility 35 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड मतदारसंघातील विधानसभा व बिद्री कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास दोन दशके आमनेसामने उभे ठाकत असलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील हे गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. अर्जुनवाडा येथे आयोजित प्रचार मेळाव्यात भाषण करताना आबिटकर व पाटील यांनी, ‘महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगड तालुक्यांचा सिंहाचा वाटा असा विश्वास व्यक्त केला.
             
महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राधानगरी व भुदरगड तालुक्यातील ठराव धारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मंत्री हसन मुश्रीफ, यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आबिटकर म्हणाले, सत्तेच्या पाठबळाशिवाय सहकाराच्या विकासाला गती मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या विकासाचा महायुतीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मागील सहा महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महायुतीची भूमिका आणि विरोधकांची भूमिका जनतेसमोर आहे              
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करणे आवश्यक आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील नाव आणि गाव वाचत बसण्यापेक्षा कापबशी हे चिन्ह दिसताच शिक्का मारावा. विरोधी आघाडीचे नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांची किंमत तीन हजार रुपये करून ते अपमान करीत आहेत.  ही पाकिटे आम्हाला मानणाऱ्या मतदारांनाच देण्याचा त्यांचा प्रचंड खटाटोप सुरू आहे. त्यांनी तयार केलेली यादी पूर्णपणे आम्हाला मिळालेली आहे. ’मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक वेगवेगळ्या कथा सांगून मतदारांचा मनभेद करण्याचे काम  करीत आहे. गेल्या निवडणुकीत राधानगरी भुदरगड तालुक्याने मताधिक्याचा उच्चांक केला होता. या निवडणुकीतही तो उच्चांक अबाधित राहील याची मला खात्री आहे. ’           

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes