+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule15 Jun 24 person by visibility 1344 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून तरुणाच्या हत्येची घटना शुक्रवारी रात्री घडली. पुलाची शिरोली सांगली फाटा येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीच्या नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्यात हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथील संकेत संदीप खामकर या तरुणाचा मृत्यू झाला. शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संकेत खामकरचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. शुक्रवारी, शिरोली-सांगली फाटा येथील बुधले मंगल कार्यालय येथे मुलीच्या नातेवाईकाचा कौटुंबींक कार्यक्रम होता. संकेत हा त्या मुलीला भेटण्यासाठी कार्यक्रमस्थळी मित्रासोबत आला होता. मुलीचे नातेवाईक व संकेत या दोघांत त्या परिसरात वादावादी झाली. शाब्दिक वाद वाढत गेला.
 प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. मारहाणीत धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे पोलिस तपासतून पुढे येत आहे. संकेत सोबत असलेल्या मित्रालाही धमकावण्यात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्या मित्राने तेथनू पळ काढला. संकेतच्या नातेवाईकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत रक्ताच्या थारोळयात पडला होता. पोलिस ही घटनास्थळी पोहोचले होते. संकेतला उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृ़त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संकेत हा सैन्यदलात भरती होण्याची तयारी करत होता. आजींनी त्याचा सांभाळ केला होता.