Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापकाचाही सहभागरंगमंचावर उलगडणार रणरागिणी ताराराणींचा इतिहास, मंगळवारी कोल्हापुरात प्रयोगपंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांचे गुरुवारी व्याख्यानटीईटी पेपर फुटी प्रकरणी आणखी ११ जणांना अटक, आरोपींची संख्या १८ पर्यंत पोहोचलीतात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर संधी विषयक कार्यशाळामेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपदप्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवटीईटी पेपर फोडण्याचा कट पोलिसांनी उधळला, नऊ जणांना घेतले ताब्यातमिशन ५० हजार घरकुलासाठी जिप प्रयत्नशील - प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशीशहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा, बारा संघांचा सहभाग

जाहिरात

 

गणपतीपुळेत समुद्रात बुडणार्‍या कोल्‍हापुरातील महिलेला वाचवले

schedule30 Jan 23 person by visibility 588 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या कोल्हापुरातील महिलेला समुद्रात बुडताना वाचविले. जीवरक्षकांनी संबंधित महिलेला सुखरूप बाहेर काढले. प्रियांका बालाजी सपाटे (वय ३०, मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज सोमवारी (दि. ३०) दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी एक वाजता समुद्रात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने महिला गटांगळ्या खाऊ लागली. ही बाब जवळच असणाऱ्या त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. जीव रक्षकांनी पोलीस व मोरया वॉटर स्पोर्टच्या मदतीने बुडणार्‍या महिलेला पाण्याबाहेर काढण्यात आले.
त्यानंतर रूग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून डिस्‍चार्च देण्यात आला. गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक गणपतीपुळे, पोलीस नाईक प्रशांत लोहारकर, पोलीस शिपाई सागर गिरी गोसावी, मोरया वॉटर स्पोर्टस् यांनी विशेष मेहनत घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes