महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने स्मॅक भवनमध्ये शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिला उद्योजकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले व खजानीस बदाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहमेळाव्यामध्ये ग्नट फौंड्रीच्या संचालिका आशा सुरेन्द्र जैन, व्हर्साटाईल इंडस्ट्रीजच्या संचालिका श्रीमती बिना जनवाडकर, व्हर्साटाईल इंजिनीअर्सच्या अमृता यतीन जनवाडकर, श्रीराम फाउंड्रीच्या कार्यकारी संचालिका जिया नीरज झंवर व अंकिता रोहन झंवर, यश मेटॅलिक्सच्या कार्यकारी संचालिका राजसी आदित्य जाधव-सप्रे, सप्रे प्रिसिजन च्या पार्टनर रेणुका अजय सप्रे, सिनर्जी ग्रीनच्या श्रेया सचिन शिरगावकर, पायोनियर मशीन्सच्या प्रोप्रायटर श्रीमती दीपा पत्रावळी, राठोड ज्वेलर्सच्या रीवा चंद्रकांत राठोड, ॲक्युरा टेकच्या कृष्णा अमर जाधव, कनेरी इंडस्ट्रीजच्या संयोगिता श्रेणिक पाटील, धवल इंजिनिअरिंगच्या मित्रा अमेय किर्लोस्कर व सुपर-सील इंडस्ट्रीजच्या शीतल केतन नित्सुरे उपस्थित होत्या. त्यांचा स्वयम् या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पेंटिंग्ज देऊन स्वागत करण्यात आले.
याव्यतिरिक्त मेनन पिस्टनच्या गायत्री व कुमारी शरण्या सचिन मेनन, प्रियदर्शनी पॉलीसॅक्सच्या वैशाली प्रीतम संघवी, विश्वकर्मा फौंडर्सच्या वैशाली दीपक जाधव, चौगले सिमेंट पाईपच्या कांचन जयसिंगराव चौगले या परगावी असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.
सुरेन्द्र जैन यांनी स्मॅक, स्मॅक आयटीआय व स्मॅक क्लस्टर मधून केला जाणाऱ्या विविध कामांची माहिती दिली.
आगामी काळामध्ये स्मॅकमध्ये सुशोभीकरण व लँडस्केपिंग चा मास्टर प्लॅन तयार करणे व आयटीआय मध्ये मुलींचा प्रवेश वाढवा व शिक्षणाच्या दृष्टीने विचार मांडले.
यापुढे महिन्यातून एकदा स्मॅक भवन मध्ये महिला उद्योजकांनी एकत्रित बैठक आयोजित करावी अशी चर्चा केली व स्मॅक भवनमध्ये महिला व अन्य विषयक सेमिनारस व कार्यशाळा आयोजित करण्याकरिता आवाहन केले.
केंद्र व राज्य सरकारद्वारा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया द्वारा महिला उद्योजकांसाठी विविध योजना आहेत त्याबाबत माहिती घेऊन चर्चा घडवावी असे ठरले.