+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Feb 24 person by visibility 242 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन  : अचूक आणि वस्तुनिष्ठ बातम्या, दर्जेदार लेखन, वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं प्रभावी माध्यम म्हणजे, ‘महाराष्ट्र न्यूज वन’!. या न्यूज पोर्टलने अवघ्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत ५० लाख व्हिजिटर्सचा टप्पा पार केला.
  वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांच्या सदिच्छांच्या बळावर महाराष्ट्र न्यूज वनने ही मजल मारली. पाच जुलै २०२० रोजी महाराष्ट्र न्यूज वनची सुरुवात झाली. प्रारंभापासूनच वस्तुनिष्ठ बातम्यावर भर दिला. कोणाचीही बाजू न घेता वस्तुनिष्ठ लेखन केल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. समाजमनाशी निगडीत विविध विषयांची मांडणी केली. राजकीय, महापालिका, जिल्हा परिषद, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडी अचूक स्वरुपात वाचकांपर्यंत पोहोचविल्या. कोल्हापूर शहरातील विविध समस्या मांडल्या. कला, क्रीडा क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहित केले. चांगल्या उपक्रमांना समाजासमोर आणले. जे चांगले त्याचे कौतुक केले. जे चुकीचे त्याच्याविरोधात लिहिले. यामुळे महाराष्ट्र न्यूज वन वाचकांच्या आवडते माध्यम ठरत आहे. 
 या ऑनलाइन, डिजिटलच्या माध्यमातून  अनेक प्रश्नांना वाचा फोडली. महाराष्ट्र न्यूज वनची बातमी म्हणजे विश्वासार्हता अशी ओळख निर्माण झाली. आतापर्यंतच्या वाटचालीत वाचक, जाहिरातदार यांनी साथ दिल्यामुळे ५० लाख व्हिजिटर्सचा हा टप्पा कमी वेळेत पूर्ण झाला. महाराष्ट्र न्यूज वन हे केवळ कोल्हापूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडीवर प्रकाशझोत टाकते. विविध क्षेत्रातील राज्यस्तरावरील घडामोडी, बातम्या सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज वनने वाचकांना उपलब्ध करुन दिल्या. यामुळे वाचकांची नेहमीच पसंती मिळतेय, ‘महाराष्ट्र न्यूज वन’ला !