Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभकैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शनमहापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चाप्रा. संदीप पाटील यांना पीएचडीयुद्धात भारताच्या विजयासाठी-सैनिकांच्या सुरक्षेसाठी अंबाबाईला साकडेशांतीनिकेतन शाळेसमोर सेंद्रीय शेती उत्पादनांचे प्रदर्शन सदाशिव येजरेंच्याकडून दोन्ही पदाचा कार्यभार काढला ! नव्या अधिकाऱ्यांच्याकडे कार्यभार !!केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय -खासदार धनंजय महाडिकटेक्नोलॉजिया स्पर्धेत डीवाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेज अव्वल ! न्यू कॉलेजला उपविजेतेपद !!महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

जाहिरात

 

११५३ कोटीचे महापालिकेचे आपले बजेट, शहरातील मालमत्तांचा रिव्हिजन सर्व्हे ! घरफाळा-पाणीपट्टीत वाढ नाही!!

schedule23 Mar 23 person by visibility 858 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने २०२३-२४ या वर्षासाठी महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प व वित्त आयोगाचे मिळून ११५३ कोटी ९२ लाख रुपयांचा अंदाजपत्रक सादर केले.पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक व्यस्था, महापालिकेच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण अशा बाबींना ठळक तरतूदी केल्या आहेत. हवा प्रदूषण व नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.
 “शहरातील नागरिक, संघटनांच्या थेट सूचना मागवून महापालिकेने ‘आपले बजेट’सादर केले आहे. यामध्ये सगळया घटकांच्या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्यक्रम दिले आहे.” असे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. घरफाळा आणि पाणीपट्टीत कसलीही वाढ नाही. दरम्यान महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षात शहरातील सगळया मालमत्तांचा रिव्हिजन सर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे. यामधून नव्याने कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध होउन उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वॉटर ऑडिट करुन पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. यंदाचा अंदाजपत्रक मांडताना शहरातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. 
महापालिकेच्या अंदाजपत्रकात अव्वल शिलकेसह महसुली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम ७५४ कोटी ४४ लाख रुपये इतकी अपेक्षित आहे. तर खर्चाची रक्कम ७५४ कोटी ३० लाख इतकी आहे. गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्यासाठी ऑगस्ट २०२३ अखेर मुदतवाढ दिली आहे. खासगी जागेत पार्किंचा विषय प्रस्तावित आहे. परवाना विभागामार्फत शहरातील विना परवाना व्यवसायांचा शोध घेण्यासाठी परवाना रिव्हीजन सर्व्हे होणार आहे. यंदाच्या बजेटमधील ठळक बाबी सांगताना बलकवडे म्हणाल्या, “मनपा स्वनिधीमधून रस्ते बांधणी, गणपती विर्सजन मिरवणूक मार्ग, नवरात्री उत्सव मार्गाचे पॅचवर्क व रस्ते दुरुस्तीसाठी भरीव तरतूद आहे. स्वनिधीमधून विविध लेखाशिर्षमध्ये रस्ते बांधणी व पॅचवर्क-दुरुस्तीसाठी २१ कोटी रुपयांची तरतूद आहे. महापालिकेतर्फे डांबरी प्लॅन्ट उभारणी होणार आहे. यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांची तरतूद आहे. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून विकसित रस्त्यांच्या स्टॉर्म वॉटर कनेक्टिव्हिसिटी पन्नास लाख रुपयांची तरतूद आहे.
...............
अडीच कोटीचा मॉडेल रस्ता
कळंबा साईमंदिर ते साळोखेनगर पाण्याची टाकीपर्यंत मॉडेल रोडसाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पार्किंग-ट्रॅफिक मॅनेजमेंट, सिग्नल सिंक्रोनायझेशनसाठी एक कोटी २५ लाख रुपयाची तरतूद आहे. महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या प्राथमिक कामकाजासाठी अंदाजपत्रकामध्ये दोन कोटी तरतूद केली आहे. शहरातील मलनि:स्सारण व्यवस्थापनासाठी चार नाला झोनकरीता चार डिपीआर व तलाव संवर्धनाचे रंकाळा व लक्षतीर्थ असे दोन डीपीआर तयार केले आहेत. सहा प्रकल्पांची एकूण किंमत ३३७ कोटी ८४ लाख इतकी आहे. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रकल्प, रंकाळा तलाव परिसर विकास, हेरिटेज वास्तूंचे संवर्धन, खासबाग मैदान येथे प्रदर्शनीय कुस्ती, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके - केशवराव भोसले नाटयगृह-खासबाग परिसर विकास योजना टप्पा दोन (एक कोटी रुपयांची तरतूद) समाविष्ठ आहेत.
राजारामपुरी जगदाळे हॉल येथे सुसज्ज आर्ट गॅलरीसाठी वीस लाखाची तरतूद आहे. नवीन ट्रक टर्मिनसची व्यवस्थेसाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद आहे. हुतात्मा पार्क नजीकचा पूल व संभाजी पूल दुरुस्ती व सौंदर्यीकरणसाठी ५३ लाख निधीची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. महानगरपालिका बागांचा विकास व सिद्धळा गार्डन व महावीर गार्डन येथे रोपवाटिकेसाठी वीस लाखांची तरतूद आहे.
इराणी खण स्वच्छता व मुर्ती विर्सजन टप्पे तयार करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये ५० लाख तरतूद केली आहे. शिवाजी मार्केट येथे महिला संचलित मार्केट विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे.
महापालिकेच्या कॉलेजमध्ये ‘रोड सेफ्टी’ अभ्यासक्रम, बोंद्रेनगर येथे प्रधानमंत्री आवास योजना, पंचगंगा स्मशान भूमी विकास, हॉकी स्टेडियम गाळे विकसित करणे, ई-लायब्ररी, जेष्ठ नागरिकांसाठी रिडींग रुम, हुतात्मा गार्डन येथे शहरातील स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मारक, फिजिओथेरपी सेंटर अद्ययावत, हेल्थ वेलनेस सेंटर, सावित्रीबाई फुले रुग्णालय व पंचगंगा रुग्णालय सुविधा अंदाजपत्रकात समाविष्ठ आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes