शाळा, मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक
schedule04 Dec 23 person by visibility 216 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
मोबाईल शॉपी, शाळेत चोरी करणाऱ्या तिघा संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा असून पकडले. त्यांच्याकडून एक लाख ६९ हजार ९७० रुपये चा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्याजवळ साईराज मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी २२ जुलै रोजी चोरी केली होती. मोबाईल शॉपी मधील मोबाईल व अन्य साहित्य असा 62 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. चंदगड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चोरीचा तपास सुरू केला. या विभागातील अंमलदार राजू कांबळे यांना शिनोळी येथील अनिरुद्ध बिरजे याने चोरी केल्याची माहिती मिळाली. अनिरुद्ध बिरजे हा नेसरी बस स्टॉपवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, राजू कांबळे ,प्रकाश पाटील, कृष्णात पिंगळे, तुकाराम राजगिरे, समीर कांबळे यांनी सापळा रचला.एका मोटार सायकल वरून नेसरी बस स्टॅंड वर दोघेजण आले. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची चौकशी करून अनिरुद्ध बिरजे आणि कुमार किरण मंगळाळकर (वय१९, दोघे या.शिनोळी खुर्द )या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक टॅब मिळून आला. दोघांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ब्लूटूथ, पेन ड्राईव्ह, सिस्का कंपनीचे बल्ब, कुमार विद्यामंदिर वाडी मडिलेवाळीख चंदगड येथील शाळेतील चोरी केली दोन टीव्ही, मॉनिटर, गॅस शेगडी, दोन कॅमेरे हस्तगत केले. दोघांना अटक करून पोलिसांनी चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले.