सुशितोतर्फे कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात
schedule10 Mar 23 person by visibility 369 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
युवती आणि महिलांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारा सुशितो एंटरप्राईजेस आणि वावा मल्टी हॉलच्यावतीने आयोजित वावा महिला गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात झाला. यंदा या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. या सोहळ्यात अकरा कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.
संचालिका अश्विनी तोडकर यांनी समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या कार्यक्षमपणे आपले काम करत असतात पण अशा महिलांचे कौतुक होत नसते. वावा महिला गौरव पुरस्कार अशा कर्तुत्वान महिलांचा यथोचित सत्कार करून त्यांना नवीन क्षितिजे गाठण्यासाठी उत्साहित करतो. त्यांच्या कार्याचा आदर्श इतरही अनेक महिलांनी घ्यावा यासाठी या सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले. गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सरला पाटील उपस्थित होत्या. ब्लूमिंग बर्ड्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका वैशालीनीराजे रंजीतसिंह चव्हाण व माजी महापौर सरिता नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुशितो एंटरप्राइजेस ही हॅन्ड टूल्स आणि पावर टूल्स विक्रीमध्ये आघाडीवर असणारी फर्म आहे. सुशितो एंटरप्राईजेस आणि वावा मल्टीपर्पज हॉलचे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक सुधाकर तोडकर, संचालक रोहन तोडकर व संचालिका अश्विनी तोडकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून महिला गौरव पुरस्कार २०२३ सोहळ्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रिया प्रकाश पाटील, खेळाडू श्रुतिका विश्वास बराले, उद्योजिका संध्या संतोष पाचुंदे, पोलीस खात्यातील अधिकारी स्वाती माळी- राजमाने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पाडळी बुद्रुक उपसरपंच ललिता दीपक पाटील, उद्योजिका स्नेहल धाकोजी, वडणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील, प्रशिक्षका सुषमा रमेश पिसाळ, उद्योजिका आरती उदय वाळवेकर, निवेदिका राधिका योगेश जोशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रूपाली पवार यांनी आभार मानले.