+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Apr 24 person by visibility 49 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनॅजमेंट विभागातील मास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन च्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. घोडावत विद्यापीठाने अगदी कमी कालावधीत विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
     दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. यावर्षी संस्थेने प्रामुख्याने एशियन पेन्ट्स ,जारो एज्युकेशन, एचएफएफसी, टी -कॉग्निशन , सर्चबॉर्न कन्सल्टिंग, वोडाफोन -आयडिया, एअरटेल, इंडिया मार्ट , डि- मार्ट, टाटा ग्रुप , बंधन बँक, स्टँटेक, पिरामल फायनान्स लिमिटेड, सिझफायर ,फेडरल बँक, संजय घोडावत ग्रुप , बायज्यूज, रिलायन्स जिओ, आयडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, आयसीआयसीआय बँक अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज 4 लाख तर सर्वोच्च पॅकेज 9 लाख पर्यंत प्राप्त झाले.नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्वप्निल हिरीकुडे, आय यु आर संचालक प्रा.डॉ. एन.व्ही.पुजारी, ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा. रोहित लांडगे,प्रा.सागर कुरणे यांचे सहकार्य लाभले.
   या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या डीन डॉ. योगेश्वरी गिरी यांनी अभिनंदन केले आहे.