Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रमगोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्यडीवाय पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला इंडिया स्किल्स  स्पर्धेमध्ये रौप्यपदकसोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला जीपीएलचा मानकरी ! रंगनाथ स्पोर्ट्स उपविजेता!!दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शन

जाहिरात

 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधन

schedule22 Apr 26 person by visibility 60 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीकृष्ण तथा एस.एस. महाजन यांचे बुधवारी  (२२ एप्रिल २०२६ )  पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

 महाजन हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख तथा वरिष्ठ प्राध्यापक होते. लेखांकन, वित्त आणि उद्योजकता या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व राहिले. त्यांनी निर्गुंतवणूक, उद्योजकीय वित्त आणि वित्तीय समावेशन यांसारख्या विषयांवर संशोधन केले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तसेच सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली. अनेक समाजाभिमुख उपक्रम त्यांनी या केंद्रांच्या माध्यमातून राबविले. विद्यापीठासमवेत विविध आघाडीच्या आस्थापनांचे सामंजस्य करार घडवून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. 
डॉ. महाजन यांनी आपले पदव्युत्तर तसेच पीएचडीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातूनच पूर्ण केले. आर्थिक समावेशन आणि उद्योजकीय वित्त या विषयांवरील संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले. निर्गुंतवणूक, वित्त व व्यवस्थापन, आर्थिक समावेशन इत्यादी विविध वाणिज्यिक संशोधनपर विषयांवर प्रसिद्ध झालेले आणि विविध परिषदांत सादर केलेल्या शोधनिबंधांची संख्या दीडशेहून अधिक आहे. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापनदिनी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला होता. महाजन यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९६९ रोजी झाला होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes